logo1

“ समर्थ कृषी मांदियाळी ”

कृषी व पशु गोवंश विभाग

 सेवा मार्गाच्या कृषी विभागातील  महत्वपूर्ण  असलेल्या “ समर्थ कृषी मांदियाळी ” या उपक्रमाद्वारे आजपर्यंत हजारो गरजू व होतकरू शेतकऱ्यांना :

  • सेंद्रिय तसेच अल्प खर्चातील शेती
  • गो-संगोपन
  • शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान
  • कृषी जोडव्यवसाय व स्वयंरोजगार

यांसारख्या अनेक विषयांवर जिल्हा व गाव निहाय मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन या शेतकऱ्यांना सावरण्याचे प्रयत्न प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने सेवा मार्गाच्या कृषीदूतांकडून केले जात आहे.

logo1
  • logo1
  • logo1
  • logo1
  • logo1
  • logo1
       अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या “कृषीशास्त्र विभागाने” आयोजित केलेले मराठवाडा विभाग स्तरीय "समर्थ शेतकरी मांदियाळी" दि.२२-मे-१६ रोजी परळी, जि.बीड येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री.आबासाहेब मोरे (प.पू.गुरुमाऊली यांचे परम श्रध्येय शिष्य तथा सुपुत्र), यांच्या शुभ हस्ते, तसेच जेष्ठ नैसगिक शेतीतज्ञ श्री. दीपक सचदे व स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
      कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती लाभलेले आदरणीय श्री.आबासाहेब मोरे यांनी कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, परळी जि.बीड येथील सेवा मार्गाच्या "पर्यावरण प्रकृती विभागातील" वृक्ष संवर्धन व लागवड उपक्रमांतर्गत रोपवाटिकेचे उद्घाटन करून करण्यात आले. या रोपवाटीकेच्या माध्यमातून शेतीसाठी उपयुक्त औषधी वनस्पती, सावली देणारे वृक्ष, काहीउपयुक्त फळझाडे, फुलझाडे, लक्ष्मी प्राप्तीकारक वनस्पती इ.शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
      शेतकऱ्यांशी संवाद साधतांना आदरणीय आबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर अनमोल मार्गदर्शन, शेतीसाठी वृक्ष लागवड व संवर्धन, सात्विक व सुसंस्कारित अन्न, मराठवाडयातील विवाह समस्या, हुंडाबंदी, कमी पाण्यावर नैसर्गिक शेतीवर येणारे पिकांची माहिती, प.पू.गुरुमाऊलींचे कृषिविषयक कार्य व आध्यत्मिक शेतीतील उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई. बाबींवर अनमोल मार्गदर्शन केले.
      विशेषत: पंचसूत्री कार्यक्रम अंतर्गत आत्महत्यापिडीत, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी आ.आबासाहेबांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच कु.अमोल मुंडे (शेतकरी कुटुंबातील सेवेकरी विद्यार्थी) प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने MPSC परीक्षेत १५ वा क्रमांक व चांगल्या पदावर रुजू झाल्याने त्याचाही सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमास जेष्ठ कृषीतज्ञ डॉ.दीपक सचदे (कृषीतज्ञ) सर्व शेतकऱ्यांना समर्थ करण्यसाठी प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून सुरु केलेल्या “समर्थ कृषी विज्ञान” च्या माध्यमातून कृषी विकासासाठी सेवा मार्गाद्वारे सुरु असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. तसेच आपल्या प्रदीर्घ अनुभवातून उपस्तीत शेतकरी प्रतिनिधींना नैसर्गिक शेतीतील तंत्र, रासायनिक शेतीचे तोटे, पिक लागवड पद्धती, बीज संस्कार, अमृतमाती, अमृतपाणी, आदींबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन श्री.दिपकजी सचदे यांनी केले.कार्यक्रमात मराठवाडयातील तसेच विविध गावा-गावातील व जिल्ह्यातील ५००-५५० शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.
१) प्रशिक्षण माहिती
logo1

२) आ.आबासाहेब मोरे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना

logo1

logo1


       अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या “कृषी व पशुगोवंश विभागाने” दि.०८-मे रोजी सातारा येथे आयोजित केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा व प्रशिक्षण शिबीराला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सेवेकरी व स्थानिक कृषीतज्ञांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री. आबासाहेब मोरे (प.पू.गुरुमाऊली यांचे परम श्रध्येय शिष्य तथा सुपुत्र), यांच्या शुभ हस्ते, तसेच श्री.मोटेसाहेब, श्री.धर्माधिकारी, डॉ. विनोद पोतदार, श्री.दीपक कान्हेरे, डॉ.प्रशांत योगी इ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
      कार्यक्रमात श्री. सतीश मोटेसाहेबांनी प्रास्ताविक मार्गदर्शन करून पंचसूत्री कार्यक्रम, सेवा मार्गातील कृषीविषयक विविध उपक्रम यांविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांशी संवाद करतांना आदरणीय श्री.आबासाहेबांनी, शेतीपुढील समस्या, सात्विक व सुसंस्कारित अन्न, देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, गावरान बि-बियाणे संवर्धन, प.पू.गुरुमाऊलींचे कृषिविषयक कार्य व आध्यत्मिक शेतीविषयक विविध बाबींवर अनमोल मार्गदर्शनपर हितगुज केले.
      उपस्थित मान्यवर तज्ञांनी शेतीविषयक माहिती, गो-संगोपनातून अर्थार्जन, कमी खर्चातील बायोगॅसचे विविध प्रकारचे मॉडेल व त्याचे फायदे, भारतीय देशी गोवंशाची शुद्धी व वृद्धी, गाईंचा आहार, चारा व्यवस्थापन मुक्त संचार गोठ्याचे फायदे, फायदेशीर गोसंगोपण, गाईंचे विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर आदींबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली तसेच प्रशिक्षणानंतर प्रयोगशील गोपालक श्री. जाधव यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या गोठ्यावर प्रात्याक्षिक पाहणी (शिवार फेरी) आयोजित करण्यात आली होती.यात खिल्लार, गीर जातीच्या गाई अझोला , हायड्रोफोनिक, मुरघास चारा, गांडूळ खत प्रकल्, गोमुत्र संकलन व्यवस्था व सेंद्रिय भाजीपाला ई प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. सेवा मार्गातील कृषी व पशुगोवंश विभागात प्रशिक्षित झालेल्या प्रतिनिधींनी गावागावात, शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान व कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
१) आदरणीय आबासाहेब मोरे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना
logo1

२) उपस्थित शेतकरी

logo1


१) उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषीदूत
logo1

२) अमृतपाणी प्रात्यक्षिक

logo1     logo1


३) अमृतमाती प्रात्यक्षिक
logo1


४) उपस्थित शेतकरी

logo1